सध्याचे सरकार असंवैधणीक असल्याने महाराष्ट्रात संविधान वाचविण्याची गरज- प्रा शाम मानव
देश विकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला
सुरेन्द्र इखारे वणी – आपल्या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 31 सीट्स आल्या त्या केवळ संविधान बचाओ च्या मागे उभे असणाऱ्या लोकांना प्राप्त झाला आहेत. आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात सध्याचे जे सरकार आहे ते संविधानाची मोडतोड करून ,संविधान अक्षरशः पायदळी तुडवून आलेलं सरकार आहे . असा असंवैधणीक प्रकार हा महाराष्ट्रात घडला आहे त्यामुळे संविधान बचाओ हा महाराष्ट्राचा जिवंत प्रश्न आहे असे प्रतिपादन प्रख्यात सामाजिक व राजकीय अभ्यासक, विचारवंत तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केला आहे.
वणी येथील शेतकरी मंदिरात वणी विधानसभेतील पुरोगामी परिवर्तनवादी विचारसरणी असलेल्या पक्ष व संघटनांनी लोकशाही वाचविण्यासाठी संविधानाची गरज या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष पांडुरंगजी टोंगे हे होते. ज्येष्ठ साहित्यिक दशरथ मडावी यवतमाळ यांची विशेष उपस्थिती होती .तसेच प्रमुख उपस्थिती माजी आमदार वामनराव कासावार, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.टिकाराम कोंगरे,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर,महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे संचालक संजय खाडे,वसंत जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी वणी चे अध्यक्ष आशिष खुळसंगे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे,भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अनिल हेपट,मराठा सेवा संघ वणी चे अध्यक्ष अंबादास वागदरकर,माकपचे एडवोकेट कुमार मोहरमपुरी , झुरमुरे उपस्थित होते.
पुढे म्हणाले सद्याचे महाराष्ट्रातील सरकार हे पुर्णत: घटनाबाह्य आणि बेकायदेशिर आहे.आणि हे ईडीच्या भितीतुन निर्माण झालेले आहे.हे सरकार बनतांना संविधान अक्षरश: पायदळी तुडविल्या गेले.त्यामुळे भाजप पुरस्कृत महाराष्ट्रातील हे सरकार निवडणुकीच्या माध्यमातुन हद्दपार करणे.हे प्रत्येक संविधान प्रेमी नागरिकाचे कर्तव्य आहे.संविधान म्हणजे फक्त आरक्षण नव्हे.तर संविधान भारतीय माणसाचे संपुर्ण जिवन व्यापुन टाकते.तसेच पुढे म्हणाले लोकमान्य टिळकांचे ब्राम्हणी नेतृत्व ते महात्मा गांधी यांचे बहुजन -सामान्य माणूस आणि स्त्रियांचा सहभाग असलेले व्यापक नेतृत्व यांवर प्रकाश टाकला.१९२५ मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचा उद्देशच देशाला ब्राम्हणी नेतृत्व देण्यासाठी होता.संघाला संविधान कधीच मान्य नव्हते कारण संविधान हे सामान्य माणूस,महिला,उच्चवर्णीय आणि धनाढ्याला समान पातळीवर अधिकार बहाल करते.तर संघ फक्त ब्राह्मण आणि तत्सम उच्चवर्णीयांच्या हिताचा विचार नेहमी करतो.म्हणून संघाची राजकीय शाखा असलेल्या बिजेपी कडून आपण सर्वसामान्य आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाची अपेक्षा करू नये.बाबरी मस्जिद पडली तेव्हापासून संविधानाला धोका सुरू झाला. त्यानंतर उत्तरोत्तर संविधानाला जाणीवपूर्वक नख लावण्याचे काम जोरात सुरू आहे.आणि सामान्य माणसाला संविधान म्हणजे फक्त आरक्षण असे वाटते.प्रा.मानव यांनी या प्रसंगी संविधान निर्मीतीच्या काळातील महात्मा गांधी,पं.जवाहरलाल नेहरू आदींच्या योगदानाचा उल्लेख केला.सध्याच्या काळात संघ आणि भाजप न्यायव्यवस्थेला सुद्धा मॅनेज करू शकते.ही मोठी शोकांतिका आणि देशासमोरचे संकट आहे.हे संकट आपण वेळीच ओळखून त्या विरोधात दंड थोपटले पाहिजेत.अन्यथा मोदी सरकार हा देश अदानी सारख्या काही लोकांना विकल्याशिवाय राहणार नाही.असा इशारा त्यांनी दिला.
याप्रसंगी झुरमुरे विचार व्यक्त करताना म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आर्थिकतेची गरज असते तेव्हा उपस्थितांनी आपल्या इच्छेनुसार क्यू आर कोड चा उपयोग करून धनाने सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ मडावी यांनी केले सूत्रसंचालन संजय गोडे तर आभार अनिल घाटे यांनी मानले .
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,शेतकरी संघटना,विदर्भ जन आंदोलन समिती आणि सेवानिवृत्त समितीच्या पदाधिकारी ,सदस्य तसेच अनिल घाटे,अजय धोबे,प्रविण खानझोडे,दत्ता डोहे,वसंत थेटे,आशिष रिंगोले यांनी पुढाकार घेतला.