वकृत्व स्पर्धेत तरफिया शेख प्रथम तर आकांक्षा धोबे द्वितीय पुरस्काराने सन्मानित
सुरेन्द्र इखारे वणी – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामगीताचार्य नारायण मांडवकर यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून आदर्श हायस्कूल येथील तरफीया शेख यांनी प्रथम तर आकांक्षा धोबे यांनी द्वितीय पारितोषिक प्राप्त करून स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.”मोबाईल आणि आजचा विद्यार्थी”या विषयावर तरफीया शेख यांनी विषयांची सुसंगत मांडणी, प्रस्तावना, आवभाव हातवारे, आवाजातील चढउतारपणा व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून अक्षरशः रसिक व श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रोत्यांनी सुध्दा टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. शालेय व खुलागट या स्पर्धेत वणी,झरी, मारेगाव, चंद्रपूर, वरोरा यवतमाळ येथील बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना वैजनाथ खडसे यांनी मार्गदर्शन केले. तरफीया व आकांशा यांचा संजय खाडे, विजयबाबु चोरडिया, प्रदीप बोनगिरवार, नारायण मांडवकर प्रा बोबडे यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. शाळेच्या नावलोकिकात भर घातल्यामुळे या विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय ते आई बाबा, प्राचार्य, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना देते. या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष तथा सचिव जयसिंगराव गोहोकर, सहसचिव महादेवराव वल्लपकर, प्राचार्य आर एल मोहिते. मार्गदर्शक शिक्षक वैजनाथ खडसे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.