मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन ची अंमलबजावणी
वणी- कायर येथील विवेकानंद विद्यालयात आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारला दुपारी 4.00 वाजता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या उपक्रमातील स्काऊट गाईड अंतर्गत “रक्षाबंधन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेन्द्र इखारे हे होते . प्रमुख उपस्थिती शारीरिक शिक्षक सतीश घुले, सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, कु सोनाली भोयर ,तसेच शाळांनायक मयूर खुटेमाटे, क्रीडांनायक रोहन मडावी उपस्थित होते. याप्रसंगी वर्ग 10 वि ची विद्यार्थिनी कु प्रणाली ताजने, सानवी चामाटे, यांनी विचार व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक सुरेन्द्र इखारे म्हणाले रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीचा पारंपरिक सण आहे या दिवशी साधा धागा बांधून बहीणभावाच्या नात्याचे रक्षण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असे मत विषद केले तसेच स्काऊट व गाईड या विषयाचे शालेय जीवनात काय महत्व आहे हे सुद्धा सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका सोनाली भोयर यांनी केले त्यानंतर विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना ओवाळून, राखी बांधून व सोनपापडी भरवून बहीणभावाचे रक्षणाचे , स्नेहाचे अतूट संबंध प्रस्थापित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम व पसायदान या गीताने झाली