कायर येथे “डाक चौपाल “ कार्यक्रम संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथे भारत सरकारच्या पोस्ट ऑफिसचे वतीने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला सकाळी 8.30 वाजता “डाक चौपाल “ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मुस्तफा शेख सर हे होते , प्रमुख पाहुणे विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे ,मार्गदर्शक पोस्ट ऑफिसचे अधिकारी अशोकजी मुंढे, केंद्रप्रमुख राजेश खुसपुरे ,सहायक शिक्षक कवडू जीवने, पोलीस पाटील मनोज अडेलवार, निलेश मंथनवार, माजी सरपंच नितीन दखणे,अविनाश उमाटे साहेब, बोकडे साहेब, गजानन चोपडे साहेब,अंकुश बोरकुडे साहेब, पोस्ट मास्टर प्रवीण पेटकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून तसेच पाहुण्यांचे स्वागत हे स्वागतम स्वागतम ,सासो की सरगम गाए सुस्वागतम,शुभ स्वागतम ,शुभ स्वागतम या गीताने करण्यात आले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक यवतमाळ जिल्हा पोस्ट ऑफिसचे अधिकारी अशोक मुंढे यांनी स्वतंत्र पूर्वकाळातील डाक विभाग ही भारत सरकारची सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणारी यंत्रणा कशी उत्तरोत्तर भारतीय नागरिकांच्या जीवनाला स्पर्श करणारी सेवा प्रदान यंत्रणा आहे. याबाबतची माहिती “डाक चौपाल” कार्यक्रमांतर्गत देण्यात आली . पुढे म्हणाले डाक विभागाद्वारे विविध योजना चालविल्या जातात यामध्ये पोस्ट सेविंग, आर डी, सुकन्या योजना, टपाल विमा, शासनाकडून मिळणाऱ्या योजनांसाठी आधार बेस खाते, व शेवटच्या माणसापर्यंत सेवा देणारी ही भारत सरकारची डाक विभाग यंत्रणा आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवडू जीवने यांनी केले तर मनोगत मुस्तफा शेख सर , व सुरेंद्र इखारे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर मडावी यांनी केले तर आभार गजानन चोपडे साहेब यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कुमुदिनी देवतळे, विना आरोडा, रविकांत गोंडलावार, कीर्ती कुलकर्णी, सोनाली भोयर, रंजना तुपे, मधुकर घोडमारे, सोनाली टोंगे, श्रुतिका फटाले, राहुल विरुळकर, विलास ढेंगळे, गजानन आसुटकर ,प्रयास कुमरे, खुशाल महारतळे, कांचन पुडके, व गणेश नेहारे, आकांक्षा, रफिक सैय्यद यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला गावकरी महिला पुरुष व दोन्ही शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित विद्यार्थ्यांना कायर पोस्ट ऑफिस मार्फत बिस्किटाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.