स्वसंरक्षण आणि आत्मचिंतन ही काळाची आवश्यकता – ठाणेदार अनिल बेहराणी
सुरेंद्र इखारे वणी :- ” महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज बाहेरची परिस्थिती अत्यंत भयावह होत असताना आणि अनेक अपरिपक्व विद्यार्थीनी स्वतःच त्याला बळी पडत असताना, समाज माध्यमावर पसरणाऱ्या अनेक गोष्टींच्या आंधळेपणाने आहारी न जाता चिंतन करून प्रत्येक गोष्टीचे सत्य जाणून घ्यायला हवे. स्वसंरक्षणासाठी शस्त्रांची माहिती घेणे आणि हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे देखील काळाच्या ओघात आवश्यक झाले आहे,” असे परखड मत ठाणेदार अनिल बेहराणी यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात शाळास्तरीय सखी सावित्री समिती अंतर्गत किशोरवयीन मुला मुलींचे समुपदेशन या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक स्वरूपात व्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे, उपप्राचार्य पुरुषोत्तम गोहोकार औषधी निर्माण शास्त्र विभागाचे प्राचार्य सुधाकर रेड्डी हे मान्यवर उपस्थित होते.
ठाणेदार श्री बेहराणी यांनी आपल्या उद्बोधनात सायबर क्राईम, महिला सुरक्षा व बाल सुरक्षा ,सोशल मीडियाचे एकंदरीत प्रॉब्लेम्स व सुरक्षा, लैंगिक समस्या ,फ्युचर प्लॅनिंग जनरल अवेअरनेस , वेपन ची माहिती ट्रॅफिक सेन्स , व्यसनमुक्ती व व्यसन अवेअरनेस अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले तथा विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे यथोचित समाधान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .किरण वांढरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मनीषा नान्नवरे यांनी केले.