भालर येथील 14 वयोगटातील मुले व मुलीचा संघ जिल्हास्तरावर
सुरेन्द्र इखारे वणी :- येथील शासकीय मैदानवर सुरू असलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत भालर येथील 14 वर्ष वयोगटातील मुले व मुली यांनी तालुक्यातील बलाढ्य संघाचा पराभव करून विजयी झाला असल्याने आता जिल्हास्तरावर हा संघ खेळणार आहे.
वणीच्या शासकीय मैदानावर तालुक्यातील बऱ्याच शाळांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये काही शाळांच सहभागी होऊ शकल्या . या कबड्डी स्पर्धे मध्ये 14 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या कबड्डी सामन्या मध्ये बलाढय संघाना हरवून तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय भालर च्या मुले व मुली या दोन्ही संघानी अंतिम सामन्यांमध्ये बाजी मारून तालुका स्तरीय विजेतेपद पटकाविले. हे दोन्ही संघ जिल्हा स्तरावर वणी तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे,
संघांच्या यशश्वीतेसाठी क्रीडा शिक्षक श्री लक्ष्मण ढेंगळे सर, प्रशिक्षक श्री कैलास खुजे सर , लांडे मॅडम,मुख्याध्यापक मनोज वरारकर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
संस्थेचे सचिव सुनिलभाऊ वरारकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले