विठ्ठलवाडी येथील नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धा संपन्न
सुरेन्द्र इखारे वणी :- येथील सार्वजनिक हनुमान मंदिर विठ्ठलवाडी येथे दिनांक 3 सप्टेंबर2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्यारेलाल बिलगये काकाजी हे होते . प्रमुख अतिथी रामचंद्र पडोळे,तुकाराम क्षीरसागर, महादेव देऊळकर, स्पर्धेचे परीक्षक विलास शेरकी, सुरेन्द्र इखारे, प्रिया लाभणे , रुपाली कुरेकर हे उपस्थित होते . यावेळी मान्यवरांचे हस्ते मंदिरातील हनुमानाचे पूजन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना स्पर्धेचे परीक्षक विलास शेरकी म्हणाले भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे शेती ही बैलजोडी शिवाय होत नाही जरी यांत्रिक युग असेल तरीही बैलांची आवश्यकता आहे . सांस्कृतिक परंपरेनुसार पोळ्याचे दिवशी बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करतो जेणेकरून लहान मुलांमध्ये बैलांबद्दल प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने बैलांची सजावट करून वेशभूषा परिधान करून मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याकरिता चिमुकले बाहेर पडतात असा हा उत्सव साजरा केला जातो असे मत व्यक्त केले. तसेच वेशभूषा परीक्षक प्रिया लाभणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नंदीबैल सजावट व वेशभूषा यांचे परीक्षण करण्यात आले यामध्ये नंदीबैल सजावट मध्ये प्रथम बक्षीस 701 रुपये स्व कांताबाई क्षीरसागर यांचे स्मृती प्रित्यर्थ तुकाराम क्षीरसागर यांनी प्रथम क्रमांक पटकावणारी कु स्वरा शंभरकर हिला दिले, द्वितीय बक्षीस 501 रुपये ऍड नितीन जुनघरे यांचेकडून कु अनुष्का महाकुलकर हिला देण्यात आले . तृतीय क्रमांकाचे बक्षीस निलेश कुरेकर सर यांचेकडून कु कृतिका कुरेकर हिला देण्यात आले तसेच वेशभूषा या स्पर्धेत प्रथम बक्षीस 701 रुपये विजय मोडक यांचे कडून मेधान अंडरस्कर याला दिले द्वितीय बक्षीस 501 रुपये शरदराव मूलकलवार यांचे कडून कु आरोही हिला दिले तर तृतीय बक्षीस 301 रुपये रामचंद्र पडोळे यांचेकडून अनुप मोहितकर याला देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुरेकर यांनी केले.तर आभार सूर्यभान चिडे यांनी मानले . या स्पर्धेत जवळपास 46 चिमुकल्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता . या नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेत मोठ्या संख्येने चिमुकल्या सोबत आईवडीलांची सुद्धा उपस्थिती होती या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सूर्यभान चिडे सर, प्रेम बलकी सर, गणेश जुनघरे, सतीश मूलकलवार ,राम बलकी , रमाकांत लखमापुरे, पिदूरकर, मांडवकर साहेब, रवी झाडे, शैलेश जुनघरी यांनी पुढाकार घेतला.