Thursday, October 3, 2024
Google search engine
HomeUncategorizedस्वयं शासन व उद्बोधनाने शाळा क्र. 7 मध्ये शिक्षक दिन

स्वयं शासन व उद्बोधनाने शाळा क्र. 7 मध्ये शिक्षक दिन

स्वयं शासन व उद्बोधनाने शाळा क्र. 7 मध्ये शिक्षक दिन

सुरेन्द्र इखारे वणी:-
वणी शहरातील शैक्षणिक दृष्टीने प्रगत असणाऱ्या नगर परिषद शाळा क्रं. 7 मध्ये शिक्षक दिन विद्यार्थ्यांच्या स्वयं शासन व उद्बोधननात्मक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता निंबाळकर, केंद्र समन्वयक चंदू परेकर हे उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृषणन् यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत पूर्ण शाळा अनुज चव्हाण, साहिल येसेकार, देवांशु गुंजेकार, रोहित कुडवे, सृष्टी सालुरकर, मैथिली अवताडे, भैरवी मडावी, वैष्णवी बघेल, अरेंसी बघेल, अर्पिता क्षिरसागर, स्वरा उपरे, खुशी झाडे, नंदिनी बावणे, सार्थक लाटकर, एकता शिखरे, मयंक मडावी, लावण्या फाळके, जान्हवी क्षिरसागर, आराध्या निंबाळकर या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन करून सांभाळली.
त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मंथन बागळदे, त्रिशा बागळदे, सार्थक लाटकर, वैष्णवी बघेल, आराध्या निंबाळकर, अनुज चव्हाण, साहिल येसेकर, साईनाथ शिखरे, ज्ञानेश्वरी शिखरे, त्रिशा बागडदे, अश्मिरा परवीन या विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर शाळेच्या शिक्षिका शुभांगी वैद्य व मंगला पेंदोर यांनी महान तत्त्ववेत्ते डॉ.राधाकृष्णन यांच्या जीवनाचा आदर्श अंगिकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदू परेकर यांनी केले. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक दिगांबर ठाकरे यांनी केले. सर्वांचे आभार विजय चव्हाण या शिक्षकांनी केले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments