उड्डाणपूलाला महापुरुषांची नावे द्या !
बसपाची मागणी
जयंत साठे नागपूर ( जिल्हा प्रतिनिधी ) बहुजन समाज पार्टी वाडी शहरच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्याधिकारी देशमुख नगर परिषद वाडी यांच्या मार्फत, नॅशनल हायवे ६ अमरावती रोड वरील डाॅ.आंबेडकर नगर वाडी ते दत्तवाडी उड्डाणपुलाला ” छ.शिवराय,फुले,शाहु, आंबेडकर” हे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
वाडी परिसरातील अमरावती नॅशनल हायवे ६ वरील तयार असलेल्या उड्डाणपूल हा येथील जनतेच्या सोयीसाठी तयार झालेला आहे, त्यामुळे येथील नागरिकांच्या वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे . ह्याकरता नितीन गडकरी यांचे अभिनंदन करण्यात आले. ह्या परिसरात छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी जनता मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत आहे त्यामुळे येथील जनतेची मागणी आहे की, ह्या उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर’ यांचे नाव देण्यात यावे.
वाडी हे प्रथम ग्रामपंचायत चे स्थान होते. कालांतराने इथे एमआयडीसी सुरू झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात लोक वास्तव्याला आले. एमआयडीसीमध्ये कामगार म्हणून ते कामाला लागले आणि कालांतराने लोकांची परिस्थिती बदलल्याने ह्याच नगरातील मजूर लोकांनी दत्तवाडी, नवनीत नगर, टेकडी वाडी अशा परिसरात वास्तव्याला सुरुवात केली. आज या परिसराची जनसंख्या लाखोच्या वरती झाल्याने हा परिसर नगर परिषद चा परिसर म्हणून ओळखले जातो. ह्या ठिकाणी वास्तव्यास असलेली बहुतांश जनता ही कामगार बहुजन जनता असून त्यांच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हे आहेत. ह्या कारणाने ह्या उड्डाणपुलाला ह्या महामानवांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी वाडी शहराच्या वतीने निवेदनात करण्यात आलेली आहे.
या प्रसंगी मा.राजकुमार बोरकर प्रभारी नागपुर जिल्हा, सुधाकर सोनपिंपळे प्रभारी वाडी हिंगणा, नरेंद्रजी मेंढे, राजेंद्र कांबळे, ज्ञानेश्वर गोलाईत, राजेंद्र पाटील, अशोक बागडे,वामन रामटेके,गिरिधारी कानेकर,मनिष रामटेके,साहिल खोब्रागडे, दर्पण लोणारे, ब्बलु मेश्राम,मंगेश नागदेवे,आयुष खंडारे,मोहन इंगळे, गोपाल मेश्राम, गौतम मेश्राम, सुभाष सुखदेवे उपस्थित होते.