विवेकानंद विद्यालय कायर येथे “हिंदी दिवस” साजरा
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात 14 सप्टेंबर 2024 “हिंदी दिवस” हा राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेन्द्र इखारे हे होते. तसेच सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, कु सोनाली भोयर , क्रीडांनायक रोहन मडावी हे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यसनमुक्तीचे नोडल अधिकारी मधुकर घोडमारे यांनी स्वच्छता विषयक उपक्रमांतर्गत येणारे व्यसनमुक्ती, व्यसनमुक्ती शपथ, व्यसनमुक्ती अभियान या विषयी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुरेन्द्र इखारे यांनी व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन करून “राष्ट्रीय हिंदी”दिवसाचे महत्व व भूमिका समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली भोयर यांनी केले तर आभार रविकांत गोंडलावार यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मधुकर कोडापे, दिलीप कानंदस्वार, आकाश बोरूले व वर्ग नाईकांनी पुढाकार घेतला.