कायर येथे “मतदान जनजागृती” रॅली
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयाचे वतीने आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोज सोमवारला सकाळी 12 वाजता “मतदान जनजागृती” रॅली काढण्यात आली.
वणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने “ मतदान जनजागृती “ कार्यक्रमांतर्गत विद्यालयाने मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा याकरिता गावातून बँड पथकाचे गजरात घोषवाक्याचे आवाजात रॅली काढून मतदारांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 100 टक्के मतदानाचा हक्क बजावण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले या रॅलीचे रूपांतर विद्यालयात सभेत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते तर सहायक शिक्षक मधुकर घोडमारे ,सोनाली भोयर ह्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी मतदान जनजागृती विषयी विचार व्यक्त करताना मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे म्हणाले की भारतीय लोकशाहीमध्ये मतदान हा अत्यन्त महत्वाचा अधिकार आहे. त्यामुळे सरकार बनविण्यात मतदारांची भूमिका महत्त्वाची असते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली भोयर यांनी केले तर आभार मधुकर घोडमारे यांनी मानले .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आकाश बोरूले, मधुकर कोडापे , सचिन टोंगे , शाळांनायक खुटेमाटे, क्रीडांनायक रोहन मडावी यांनी परिश्रम घेतले.