वणी प्रक्षेत्राच्या निवडणुकीत परिवर्तन होण्याची मतदारात चर्चा
मतदारात उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण
परिवर्तन पॅनलची प्रतिष्ठा पणाला
सुरेंद्र इखारे वणी:-वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे नेतृत्व प्राचार्य सुधीर वटे, श्याम बोढे सर, दिवाकर नरुले सर, शैलेश नांदेकर सर हे संपूर्ण पतसंस्थेच्या सभासदांची प्रत्येक्षात घरोघरी भेट घेऊन परिवर्तनाची का गरज आहे हे मतदारांना समजावून सांगत आहे .मार्गदर्शक व सर्व उमेदवार परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. वणी प्रक्षेत्राच्या नवीन संचालक मंडळासाठी उमेदवारी दाखल करताना उलथापालथ झाल्याने शेवटी सभासदांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. परिवर्तन पॅनलच्या प्रमुखांनी पतसंस्थेच्या सभासद, मतदारांच्या आग्रहाने परिवर्तन पॅनेलची निर्मिती करून, सशक्त उमेदवार पाहूनच त्यांची उमेदवारी दाखल केली . आज पतसंस्थेची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीत सर्वसाधारण गटातून चेतन गोवारदीपे, राहुल ठेंगणे, किशोर बोढे, दत्तू महाकुलकर, घनश्याम पावडे, गणेश लोहे, अनु जाती संजय मडावी, भटक्या विमुक्त जाती जमाती सुरेंद्र इखारे, इमाव गटातून संतोष बेलेकार, महिला प्रतिनिधी कु वंदना शंभरकर ,सौ सीमा सोनटक्के यांना उमेदवारी दिली आहे.हे सर्व परिवर्तन पॅनलचे उमेदवार विमान चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या मतदारात एक जल्लोष व उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे .
या वणी प्रक्षेत्राच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारात पान ठेल्यावर तर कधी चौपाटीवर चर्चा दिसून येतआहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






