तालुकाध्यक्षपदी सूर्यभान चिडे तर सचिवपदी प्रवीण वैद्य यांची निवड
धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची कार्यकारणी घोषित
सुरेंद्र इखारे वणी :- येथील वाघोबा-खंडोबा देवस्थान येथे नुकत्याच झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सूर्यभान चिडे तर सचिवपदी प्रवीण वैद्य यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली .
वणी तालुक्यात धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची सभा सम्पन्न झाली . या सभेत नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली . सभेच्या अध्यक्ष स्थानी आदरणीय पांडुरंगजी पंडिले साहेब हे होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून धनगर अधिकारी कर्मचारी संघटना यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मीप्रसाद वाघमोडे साहेब उपस्थित होते. तसेच धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य विलास शेरकी,आशिष साबरे,रघुनाथ कांडारकर,गजानन तुराळे, जिल्हा शिक्षक नेते राजेश भाऊ निरे,विनोद खंडाळकर, वसंतराव गोरे, काशिनाथ पचकटे, भाऊराव मत्ते, विलास गवारकर उपस्थित होते . या सभेत राज्य अधिवेशन यशस्वी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यांनतर वणी तालुका कार्यकारिणी ची सर्वांनुमते निवड करण्यात आली त्यात वणी तालुक्यातून जिल्हा प्रतिनिधी म्हणून जेष्ठ नेते वसंतराव गोरे यांची, आणि तालुका अध्यक्ष म्हणून सर्वपरिचित, जिल्हा शिक्षक नेते सूर्यभान चिडे , तालुका सचिव म्हणून जिल्हा परिषद चे धडाडीचे नेते प्रवीण वैद्य , कार्याध्यक्ष म्हणून किशोर बुच्चे युवा नेते, तर कोषाध्यक्ष म्हणून सुरेंद्र बुच्चे तालुका उपाध्यक्ष म्हणून धडाडीचे नेते विलास चामाटे , संघटक म्हणून धडाडीचे महसूल चे नेते रघुनाथ कांडारकर आणि प्रसिद्धीप्रमुख म्हणून गजानन तुरारे तालुका महिला प्रतिनिधी म्हणून विद्या सांबरे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली तसेच बाकी विभागातील कर्मचारी यांना संधी मिळावी म्हणून पुढील मासिक सभेत उर्वरित पदे भरण्याचे ठरले.याप्रसंगी मंचावर राज्यप्रतिनिधी पवन थोटे, जिल्हा कार्याध्यक्ष भूमन्ना कसरेवार, जिल्हा सचिव संदीप खांदवे, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीप्रसाद वाघमोडे उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणी चे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.सभेचे सूत्रसंचालन आशिष साबरे सरांनी केले , प्रास्ताविक संदीप खांदवे सरांनी केले तर आभार गजानन तुरारे सर यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे सदस्यांनी सहकार्य केले.