Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedदेशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा - राहुलजी गांधी

देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा – राहुलजी गांधी

संघ व भाजपाने आदिवासींना वनवासी म्हणून त्यांचे हक्क हिरावले

लाखोंच्या संख्येने जनसमुदाय

सुरेंद्र इखारे वणी – वाशीम येथे आदिवासी समाज बांधवांनी क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन केले होते

या निमित्ताने भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांची भारत जोडो पदयात्रा वाशीम येथे पोहचली .या जयंतीचे निमित्ताने विचार व्यक्त करताना म्हणाले देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे असे ते म्हणाले होते . यावेळी बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने उपस्थित राहून राहुलजी गांधी पुढे म्हणाले ” आज का दिन कोई मामुली दिन नहीं है! भगवान बिरसा मुंडाजी अंग्रेजोसे से लढे और 24 साल की आयु मे अंग्रेज्योने उनकी हत्या की!आज उनकी सोच पर चारो तरफ से आर एस एस और बीजेपी वाले आक्रमण कर रहे है! और ” मैने आपको आदिवासी भाई बहन कहा है” तो आदिवासी का मतलब क्या होता है! ज्यो सबसे पहले था ! ज्यो हिंदुस्थान मे जो सबसे पहले था! इसका मतलब हिंदुस्थान का ज्यो ओरिजनल ओनर इसका मतलब ज्यो मलिक है वह आदिवासी है! आप है ! अगर जमीन आपकी , जो हम भारत माता कहते है और इस देश मे सबसे पहले आप आये इसलीय आपका हक्क बनता है ! अब देखीए क्या चालाकी कर रहे है यह कहते है आप आदिवासी नहीं हो! यानेकीं आपला हक्क हिरावून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.या कार्यक्रमाला थोरातजी, नानाभाऊ पटोले, शिवाजीराव मोघे, रमेश जयराम, वसंतराव पुरके, वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, वामनराव कासावार , प्रतिभाताई धानोरकर अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
पुढे राहुलजी म्हणाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे व आदीवासींच्या हक्कांसाठी निंर्णय घेतले परंतु आदिवासी, वंचीत, दलित ,अल्पसंख्याक समाजाला त्यांचे हक्क मिळू नये अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे असे मत व्यक्त केले होते. तसेच नानाभाऊ पटोले व शिवाजीराव मोघे यांनी याप्रसंगी आदिवासी बांधवांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला होता . वाशीम येथील राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला वणी येथील शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते पदयात्रेत सामील होऊन या उपस्थित कार्यकर्त्यांनी जवळपास 15 ते 20 किलोमीटर ची पदयात्रा केली वणी येथील आमदार वामनराव कासावार, सेवादल अध्यक्ष राजीव कासावार ,शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे ,ओम ठाकूर, आशिष कुलसंगे, डॅनी सँडरवार, सुरेंद्र इखारे, हर्षल नरपांडे,नासिरभाई, संध्या बोबडे, शालिनीताई रासेकार, निलीमाताई काळे, वंदना आवारी, सविता ठेपाले, व अन्य महिला काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments