17 ग्रामपंचायतीचे विजय उमेदवार घोषित *
12 ग्रामपंचायतीत महिला राज * 17 सरपंच व 138 सदस्य निर्वाचित*
आता अपेक्षा केवळ विकासाची *
सुरेन्द्र इखारे वणी – तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींपैकी 19 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली त्यामध्ये अहेरी ग्रामपंचायत अविरोध तर शिंदोला ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकला त्यामुळे 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून निवडणूक आयोगाने विजयी उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. 19 ग्रामपंचायतीमधील 26 हजार 548 मतदार होते तर यामध्ये प्रामुख्याने 17 ग्रामपंचायतमध्ये सरपंचाची व सदस्यांची निवड 24 हजार 264 मतदारांनी केली आहे तर अहेरी ग्रामपंचायत अविरोध व शिंदोला ग्रामपंचायतिचा बहिष्कार वणी तालुक्यात चुरशीची समजली जाणारी कायर गणेशपूर, चिखलगाव, ग्रामपंचायत यामध्ये शिवसेना, भाजपा व अपक्ष यांनी बाजी मारली तर काँग्रेसचा धुव्वा उडविला यामध्ये कायर येथे सरपंच नागेश धनकसार हे अपक्ष असून कुंदन टोंगे यांचे नेतृत्वात विजयी मिळविला , गणेशपूर आशा जुनगरी, तर चिखलगाव रुपाली कातकडे, हे उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीला कसल्याही प्रकारचे गालबोट न लागता शांततेत निवडणूक पार पडली ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय रंगतदार व चुरशी ची झाली या निवडणुकीत भाजपचे 9 सरपंच, शिवसेनेचे 4 , काँग्रेस एक तर अपक्ष तीन असे एकूण 17 सरपंच निवडून आले, यामध्ये वर्षा बोढे, प्रकाश बोबडे, शंकर वळकोंडे, रजनी बंदूरकर, सुवर्णा भोयर, गीता राजगडे, रखमाबाई पिंपलकर, आशा जुनगरी, रजनी पिदूरकर, आशा झाडे, स्वाती झाडे, रंजना आगीरकार, रुपाली कातकडे, नागेश धनकसार , मंगेश काकडे, गणेश टेकाम ,सविता ढवस, निवडून आले तर 138 सदस्यांची निवड झाली आहे. तालुक्यातील निवडणुका आता शांततेत पार पडल्या सरपंच व सदस्यांची निवड झाली आहे आता मात्र उपसरपंच निवड होणे बाकी आहे त्यामुळे आता गावकऱ्यांची अपेक्षा आहे ती केवळ विकासाच्या गप्पा न मारता काहीतरी वेगळ्या सोयी सुविधा आणि विशेष विकास कार्य केले पाहिजे याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे यावरच पुढील राजकीय नेत्यांचे भविष्य ठरणार आहे.आज लागलेल्या निवडणुकीची घोषणा उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसिलदार रविंद्र कापशिकर यांनी केली आहे.