28.7 C
New York
Friday, July 26, 2024

प्रा.डाॅ. मनोहर जिलठे यांच्या ‘रिपल्स ऑफ निर्गुडा’ या इंग्रजी ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

प्रा.डाॅ. मनोहर जिलठे यांच्या ‘रिपल्स ऑफ निर्गुडा’ या इंग्रजी ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी: –  करुणासागर बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा प्रा. डॉ. मनोहर जिलठे यांच्या ‘रिपल्स ऑफ निर्गुडा’ या इंग्रजी ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवारी 19 मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता अर्पण सभागृह हिंदी मोर भवन सीताबर्डी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी आणि आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. यशवंत मनोहर,तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डाॅ.रमेश शंभरकर व लेखक मनोहर जिलठे उपस्थित राहतील. या पुस्तक प्रकाशन समारंभात कार्यक्रमाची भूमिका शालिक जिल्हेकर हे मांडतील, तर लेखका संबंधीत आठवणी कविता फुलझेले व माजी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे बबनराव जिल्हेकर सांगतील. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालिक जिल्हेकर व हृदय चक्रधर परिश्रम घेत आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News