रचनात्मक व शाश्वत कार्य करण्यासाठी महात्मा फुले व बाबासाहेबांच्या विचारांची आवश्यकता –प्राचार्य डॉ. अविनाश घरडे
सुरेन्द्र इखारे वणी – मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आली. याप्रसंगी विचार व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे म्हणाले की महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे रचनात्मक व शाश्वत नैसर्गिक स्वातंत्र्य जोपासणारे आहेत व ते कार्यासाठी प्रेरणादायी आहेतच त्याचबरोबर ते नैसर्गिक स्वातंत्र्याची जोपासना करणारे आहेत. असे विचार त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. महापुरुषांच्या जयंत्या ह्या नाचून नाही तर वाचून साजरा कराव्यात असे मार्मिक उदबोधन प्रा. डॉ. गणेश माघाडे यांनी व्यक्त केले. ते प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
यावेळी श्री. गजानन कासावार व प्राचार्य डॉ. रोहित वनकर यांचा अभिनंदन सोहळा देखील संपन्न झाला. गजानन कासावार यांची नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांचे पत्रकारितेतील,सामाजिक व शौक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे तसेच प्राचार्य डॉ. रोहित वनकर यांचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील समाजशास्त्र अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली ही समाजबांधवासाठी अभिमानाची बाब आहे. दोन्ही मान्यवरांचा अभिनंदन सोहळा प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. हेमंत चौधरी यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. गजानन सोडणर यांनी केले. याप्रसंगी डॉ. राजेश चवरे, डॉ. विनोद चव्हाण, डॉ. माधुरी तानूरकर, डॉ. संदीप केलोडे, डॉ. अनिल अडसरे, प्रा. अक्षय जेनेकर, डॉ. सुधीर चिरडे, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. विभा पोटदुखे, प्रा. प्रदीप माकडे, प्रा. राजश्री गडपायले, प्रा. स्नेहल भांदकर, डॉ. मंजू परदेशी, प्रा. शैलेश आत्राम, डॉ. नितेश राऊत, प्रा. रुपेश वांढरे, अभिजीत पंढरपुरे, आकाश कुमरे, सुरज तोडसाम व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. अनिल अडसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रा.से. योजना व इतिहास विभागातील विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.