28.7 C
New York
Friday, July 26, 2024

वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी     

वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी       

मतदानासाठी चार केंद्र ;  एक हजार 855 मतदार बजावणार हक्क           

सुरेंद्र इखारे वणी –      येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचीनिवडणूक 28 एप्रिल 2023 ला होत आहे. या निवडणुकीत एक हजार 855 मतदार चार केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अशोक झाडे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.          वणी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिल 2023 ला होऊ घातली आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. यावर्षीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार संख्येत वाढ झाली आहे. आज रोजी या निवडणुकीत एक हजार 855 मतदार मतदान करणार आहे. यामध्ये 18 संचालकांची निवड होणार आहे. यात मापारी हमाल या मतदार संघातून एक , व्यापारी अडते मतदार संघातून दोन, सहकारी सोसायट्या मतदार संघातून अकरा, तर ग्रामपंचायत मतदार संघातून चार अशी निवड होणार आहे. या चारही मतदार संघात उभे असलेले उमेदवार जसे मापारी व हमाल मतदारसंघात चार उमेदवार उभे असून 89 मतदार आहे, व्यापारी अडते संघात चार उमेदवार उभे असून 125 मतदार आहे. सहकारी सोसायटीत 22 उमेदवार उभे असून 68 सोसायट्यामधून 845 मतदार आहे तर ग्रामपंचायत मतदारसंघात आठ उमेदवार उभे असून793 मतदार आहे असे एकूण एक हजार 855 मतदार असून वणी जिल्हा परिषद शाळा, शिंदोला, कायर, रासा या चार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहे. तेव्हा वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी भालेराव साहेब ,सहायक निवडणूक अधिकारी पिसाळकर साहेब व इतर कर्मचारी काम पहात आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News