28.7 C
New York
Friday, July 26, 2024

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन

नागपूर ( जयंत साठे ) :-  साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर व श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दिक्षाभूमी चौक येथील पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनाचे आयोजन करुन डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
सदर प्रसंगी अतुल वासनिक, सहाय्यक संचालक, वित्त व लेखा, रमेश सहारकर, लेखाधिकारी, सुखदेव कौरती समाज कल्याण अधिकारी, भारत मेश्राम, वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी, मनोहर उचे, प्रमुख लिपिक, दीपक कुसरे, टापरे, श्रीमती छाया बागडे, श्रीमती लीना सरोदे, निखिल मेश्राम, शैलेश चव्हाण, दिनेश सुखदेवे, अर्चना सातघरे, सारीका बोरकर, जयश्री धवराळ, ज्योती मानके, विक्रांत उसरबरसे, गणेश बच्छे, हेमंत खवशी, विवेक दांडेकर, झोड, विवेक गजभिये, गजानन शेळके, सागर चव्हाण इ. तसेच प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News