शिक्षक दिन उत्साहात साजरा
सुरेन्द्र इखारे वणी – लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षक दिन ” साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य प्रशांतजी गोडे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख उपस्थित प्राचार्य दिया सिंग परिहार मॅडम उपस्थित होत्या. उच्च प्राथमिक ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकप्रति आदर व सन्मान व्यक्त करीत विविध नृत्य व संदेशपूर्ण नाटक व्यक्त केले. तसेच शिक्षकांकरिता विविध मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन केले. प्राचार्य प्रशांत गोडे यांनी शिक्षकांचे कर्तव्य व शिक्षकासमोरील नवीन पिढीतील सृजन नागरिक घडविण्याकरिता असलेले आव्हान त्यांच्या प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सुमय्या सैय्यद व समिया पटेल यांनी केले तर आभार स्नेहल परबत हिने मानले या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते