नागरिकांचा श्वास असलेले संविधान जिवंत ठेवा- रणजीत मेश्राम
काष्ट्राइब द्वारा संविधान दिन साजरा
नागपूर जयंत साठे -डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनातील अनेक कळा सोसून अमूल्य असे संविधानाला जन्म दिला व जगातील सुंदर असे संविधान देशाला दिले,भारतीय संविधानातून शोषित वंचित समूहाच श्वास मोकळा झाला.आज या संविधानाचा गळा घोटण्याचे सुरु आहे संविधान जनतेचा श्वास
आहे ते जिवंत ठेवा असे प्रतिपादन प्रसिद्ध पत्रकार रणजीत मेश्राम यांनी काष्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ सलग्न काष्ट्राईब महिला आघाडी द्वारा आयोजित संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान आणि आम्ही या विषयावर चर्चा सत्र व कवी संमेलन प्रसंगी संविधान चौक येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब, तर प्रमुख पाहुणे ऍड रोशन बागडे, अध्यक्ष नागपूर बार असोसिएशन, प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डाँ सुरेश चवरे माजी आमदार एस क्यू जमा, काम्रेड अरुण वनकर, घनश्याम फुसे, काम्रेड राजेंद्र साठे,यशवंत निकोसे, प्रा रमेश पिसे,प्रा राहुल मुन,अब्दुल पाशा मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रानंतर एम एस जांभुळे लिखित व डाँ वीणा राऊत दिग्दर्शीत संविधान जागर लघु नाट्य सदर केले.
दुसऱ्या सत्रात गोविंद वाघमारे, यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन आयोजित करण्यात आले संमेलचे संचालन मनोहर गजभिये, खेमराज भोयर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुषमा कळमकर, संचालन माया उके व सिताराम राठोड यांनी केले व आभार प्रगतीताई पाटील यांनी केले.प्रा एम एस वानखेडे, प्रा जयंत जांभुळकर, सुगत रामटेके अरविंद पाटील, अशोक पाटील, जयंत साठे, उपस्थित होते…