मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिवाळी अधिवेशन समारोपिय पत्रकार परिषद
अधिवेशनात भरगच्च 17 विधेयक मंजूर
जयंत साठे नागपूर :- येथील राज्य विधिमंडळाच्या चाललेल्या सहा दिवसाच्या भरगच्च हिवाळी अधिवेशनात राज्यसरकारने 17 विधेयक मंजूर करून एक जनसुरक्षा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आले अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या अधिवेशनात विदर्भ मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनासह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्राबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित समतोल, सर्वांगीण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर हिवाळी अधिवेशनाचा समारोप झाला त्यानंतर पत्रकार परिषद झाली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना म्हणाले रात्री खाते वाटपही करण्यात आले आहे. असेही म्हणाले यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राठोड, नितेश राणे व अन्य मंत्री उपस्थित होते.