लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी विविध उपक्रमासहसंपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गोहोकार आणि प्रा. नार्लावार उपस्थित होते. संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी संत गाडगेबाबा म्हणजे जनजागृतीचे चालते फिरते विद्यापीठ होते, आधी करावे मग सांगावे असे संत गाडगेबाबांचे महान कार्य होते समाजासाठी जे करता येईल ते त्यांनी मनोभावे केलं याच प्रेरणेने विद्यार्थ्यांनी सुद्धा काहीतरी त्यांच्याकडून शिकावं म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमामध्ये पूर्ण पणे सहभागी व्हा आणि समाज उपयोगी कार्य करा असा संदेश आपल्या मनोगतातून त्यांनी दिला. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छतेवर व जनजागृती वर आधारित सप्ताहाचे आयोजन केले आहे याबाबतचे माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर वांजरी या गावात पुढील सात दिवसात संपन्न होणार आहे आणि संत गाडगे महाराजांच्या दशसूत्री ला अनुसरून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे यानिमित्ताने संत गाडगे महाराजांच्या स्मृतीला उजाळा देऊन हे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न होणार आहे अशी माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास जुनगरी यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कुमारी रजनी गारघाटे हिने केले. या कार्यक्रमासाठी संजू बिलोरिया यांचे सहकार्य लाभले तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला.