गाडगे बाबांना अभिवादन
नागपूर ( जयंत साठे) सर्वसामान्यांना कीर्तनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारे, स्वच्छता अभियानाचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना आज बसपाने त्यांच्या 68 व्या स्मृतिदिना निमित्त अभिवादन केले.
कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश बसपा चे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, माजी जिल्हा प्रभारी अमित सिंग, जिल्हा महिला आघाडीच्या संयोजिका सुनंदाताई नितनवरे यांच्या नेतृत्वात आज मेडिकल चौक परिसरातील गाडगेबाबा धर्म शाळेतील गाडगे बाबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने मध्य नागपूरचे अध्यक्ष विलास पाटील, पश्चिम नागपूरचे अध्यक्ष अंकित थुल, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, पूर्व नागपूरचे अध्यक्ष मुकेश मेश्राम, युवानेते सदानंद जामगडे, विकास नारायने, अभय डोंगरे, प्रवीण पाटील, बुद्धम राऊत, नरेश गायकवाड, प्रदीप मून, प्रमोद सातपुते, नितीन रामटेके, शीला डोंगरे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
गाडगेबाबा यांचे बाबासाहेबांवर अत्यंत प्रेम होते. बाबासाहेबांच्या निधनाची बातमी गाडगेबाबांना समजल्यावर त्यांनी त्या दिवसापासून अन्यत्याग केला व पंधरा दिवसानंतर त्यांनी आपले प्राणही सोडले अशा या बाबासाहेबांच्या महान सहकाऱ्या पासून समाजाने प्रेरणा घ्यावी असे आवाहन बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केले.