सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरी
….
सुरेंद्र इखारे वणी :- कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे वाणिज्य विभागातर्फे दिनांक 3-1- 2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा डॉ माधुरी तानुरकर उपस्थित होत्या व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी विभागाच्या डॉ. वर्षा गणगणे आणि गृह अर्थशास्त्र विभागाच्या डॉ मीनाक्षी कांबळे उपस्थित होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अस्मिता ढवस व प्राध्यापक अश्विनी जाधव उपस्थित होत्या.
सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण जीवन महिलांच्या शिक्षणासाठी समर्पित केले. स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण घ्या आणि आत्मनिर्भर व्हा शिक्षण हेच स्त्रियांचा खरा दागिना आहे असे प्रतिपादन डॉ. माधुरी तानुरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन अंजली चव्हाण यांनी केले, व आभार प्रदर्शन अपर्णा मानदाडे यांनी केले.