कायर येथील विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात दिनांक 12 जानेवारी 2025 ला अध्यात्मिक गुरू, राजयोगी स्वामी विवेकानंद व राजमाता माँ जिजाऊ यांची जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ जयंतीनिमित्त गावातून बँड पथकाचे गजरात व जयघोषात प्रभातफेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव तथा शारीरिक शिक्षक सतीश घुले, जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे , सहायक शिक्षिका सोनाली भोयर, शाळांनायक मयूर खुटेमाटे, स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत साहिल केराम तर माँ जिजाऊ च्या भूमिकेत साधना चव्हाण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर घोडमारे यांनी स्वामीजींच्या जीवनचरित्राचा परिचय करून दिला. संस्थेचे सचिव सतीश घुले यांनी मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी मन की विनासे गुंजे हे स्वागत गीत कु प्रणाली ताजने,कु प्राप्ती कांबळे यांनी सादर केले तसेच जिजाऊ वंदना कु सानवी चामाटे, कु सपना शेंडे सादर केली तसेच कु गौसिया सय्यद, आयशा पठाण, प्रणाली ताजने, प्रवीण ढोंगे, साहिल केराम,प्राप्ती कांबळे,यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना स्वामीजींच्या जीवनातील प्रसंग सांगून आपणही स्वामींचे विचार अंगिकरावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा अल्प सहभाग असल्याची खंत व्यक्त करून व पुढे सांस्कृतिक कार्यक्रमत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली भोयर यांनी केले तर आभार कु प्रणाली ताजने हिने मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मधुकर कोडापे, आकाश बोरूले, दिलीप कांदसवार यांनी सहकार्य केले.