Tuesday, May 20, 2025
Google search engine

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न

सुरेंद्र इखारे वणी :-  येथील लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ ला झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत पदार्पण करून सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले आहे.

यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी विद्येची देवता मा सरस्वती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे हारार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत स्वागत गीताने करण्यात आले.तसेच मानवताही सेवा धर्म आहे या गीतावर विद्यार्थिनींनी  नृत्य सादर केले.

याप्रसंगी कार्यक्रमाला लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन डॉ रीपल राणे(PMJF) ,कबीनेट सेक्रेटरी लायन अजय सिंग तसेच लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या अध्यक्षतेखाली, लायन्स शाळा व चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, चार्टर्ड मेंबर लायन दत्तात्रय चकोर, लायन प्रमोद देशमुख ,संजीवरेड्डी बोदकुरवार, ,उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले व क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव किशन चौधरी, व पदाधिकारी,अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बुजोने सर यांनी केले व या कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी संस्थेविषयी 50 वर्षाचा इतिहास सांगून संस्थेने विद्यार्थी घडविले तसेच सामाजिक सेवा देण्याचे कार्य सुद्धा या संस्थेने केले असून पुढे समाजाला आरोग्य सेवा देण्याचा मानस सुद्धा  व्यक्त केला. तसेच श्रीकांत जोशी यांनी विचार व्यक्त करताना म्हणाले आरोग्यसेवेसाठी जे मदत देत येईल ती मदत दिली जाईल असे मत व्यक्त केले व याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच

अजय सिंग यांनी प्रश्नोत्तराचे माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून मनोगत व्यक्त केले. अजय सिंग यांचा सत्कार राजाभाऊ पाथरडकर यांचे हस्ते करण्यात आले ठाणेदार अनिल बेहरणी यांचा सत्कार बलदेव खुंगर यांचे हस्ते करण्यात आला.   विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी  स्वरा करेंडे  ,त्रिशा , चैत्यन्य चौधरी ,सक्षम पाटील, किंजल भोयर, स्वरा डोंगरकर, श्रुती भोंगळे, इशिका खराटे, श्रावणी घोसरे, समर्थ, समृद्धी भोयर,तसेच अध्यापिका प्रीती निकुरे याना मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनीत  चैताली माकडे, युतीका चव्हाण , जांनव्ही एकरे, स्वरा डोंगरकर, नैतिक चिडे, अनिकेत तुराणकर, कांचन गुरनूले . अनिकेत खिरटकर ,वैष्णवी भालेराव,या सर्व विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात उत्तम कार्य केल्याने त्यांना सुद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजाभाऊ पाठरडकर, संजीवरेड्डी बोडकुरवर , प्रमोद देशमुख, किसन चौधरी, सुधीर दामले, अनिल बेहरणी ठाणेदार या सर्व मान्यवरांना अजय सिंग यांनी डिस्स्ट्रिक पिन देऊन गौरविले. अध्यक्षीय भाषणातून राजाभाऊ पाठरडकर यांनी संस्थेने केलेल्या भूषणावह कार्याचा गौरव मंडळा कार्यक्रमाचे आभार अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular