वणीत नृसिह व्यायाम शाळेच्या मैदानावर “भव्य कबड्डीचे सामने”
सुरेंद्र इखारे वणी :- श्री नृसिंह स्पोर्टिंग क्लब वणी च्या वतीने स्व पुरुषोत्तम उर्फ बाबा कुलदिवार व स्व रामदास ठेंगणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ” भव्य कबड्डीचे सामने “ दिनांक 16 व 17 जानेवारी 2025 रोजी नृसिह व्यायाम शाळा वणी येथे आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संचालक कापूस उत्पादक पणन महासंघ संजयभाऊ खाडे, प्रमुख पाहुणे विजय चोरडिया, शिवाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद निकुरे, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ इंगोले उपस्थित होते. कबड्डी सामन्याचे प्रथम बक्षीस 20001 रुपये संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेकडून, द्वितीय बक्षीस व चषक 15001 रुपये प्रमोद निकुरे यांचेकडून, तृतीय बक्षीस व चषक 10001रुपये चैतन्य जितेंद्र डाबरे यांचेकडून, तर चौथे बक्षीस व चषक 7002रुपये हॉटेल मैफिल वणी यांचेकडून आहे या मध्ये वैयक्तिक बक्षीस सुध्दा घोषित करण्यात आले आहे यात बेस्ट रेडर, बेस्ट डिफेडर, बेस्ट ऑल रॉऊंडर याना प्रत्येकी 3100 रुपये व आकर्षक ट्रॅफि संजय ऑटोमोबाईल यांचेकडून देण्यात येणार आहे.
आज दिनांक 17 जानेवारी ला नृसिंह व्यायाम शाळेत विद्यमान आमदार संजयभाऊ देरकर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ इंगोले, सचिव पुरुषोत्तम अक्केवार, सूर्यकांत मोरे, सुरेंद्र इखारे , दादाराव राऊत, रमेश उगले, बाबाराव उगले, नांदेकर उपस्थित होते तसेच कुणाल ठोंबरे, ब्रिजेश निंदेकर, अनिकेत चिकणकार, प्रशांत येते, प्रीत नैताम, गौरव नैताम, अनिकेत वाढई,रोहित ठोंबरे, जमदाडे, जानवी ठाकरे, मेश्राम , गौरी पिदूरकर, श्रद्धा देशमुख, हिमांशी कावडे, श्रावणी आवारी, रेवती ताजने, महेश्वरी मेश्राम, अक्षरा डोंगरे, छकुली वाढई यांनी परिश्रम घेतले.