मनोज वाहने यांना विद्यापीठाचा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे स्वर्ण पदक
जयंत साठे नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 112 व्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागात एम.ए. प्रवास व पर्यटन शिक्षण घेतलेल्या व सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या मनोज वाहने यांना पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे स्वर्ण पदक प्राप्त झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय बोकरे यांच्या हस्ते मनोज वाहने यांना हे स्वर्ण पदक प्रदान करण्यात आले. मनोज वाहने यांना पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे सुवर्णपदक मिळाल्याबद्दल विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, विभागातील शिक्षक डॉ. अरविंद उपासनी, प्रा. मंजुषा डोंगरे, डॉ. अमरदीप बारसागडे, प्रा. परिमल सुरडकर, शोभना मेश्राम यांनी मनोज वाहने यांचे अभिनंदन केले. मनोज वाहने यांनी आपल्या यशाचे श्रेय विभाग प्रमुख डॉ. खोब्रागडे विभागातील शिक्षक आई वत्सला वाहने व वर्ग मित्रांना दिले.