कायरच्या विद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमासह साजरा
सुरेंद्र इखारे वणी:- तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला.
26 जानेवारी हा दिवस देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.तसेच प्रत्येक भारतीयाने देशासाठी देश हितकारक कार्य करण्यासाठी आणि त्यानुसार वागले पाहिजे यासाठी प्रतिज्ञा घेतली.
या दिवसाचे औचित्य साधून व्यवस्थापन समितीचे सचिव सन्माननीय तथा शारीरिक शिक्षक सतीश घुले यांच्या नेतृत्वात बँड पथकाच्या गजरात, घोषवाक्याच्या जयजयकाराने प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यालयाचे प्रांगणात मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांचे अध्यक्षतेखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी संस्थेचे सचिव सतीश घुले,जेष्ठ शिक्षक मधुकर घोडमारे, सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार, सहायक शिक्षिका सोनाली भोयर, प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडापे, कनिष्ठ लिपिक सचिन टोंगे, शिपाई दिलीप कंदसवार, आकाश बोरूले, शाळांनायक मयूर खुटेमाटे, क्रीडांनायक रोहन मडावी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भाषण स्पर्धा या उपक्रमाने झाली या स्पर्धेचा विषय लोकशाही व स्वातंत्र्य सेनानी देशभक्ती या विषयावर प्रामुख्याने प्रणाली ताजने, सलोनी चामाटे, सलोनी लेडांगे, आयशा पठाण, गौसिया सय्यद, सानवी चामाटे, प्रवीण ढोंगे, साहिल केराम, वर्षा मडावी, साजिया शेख, प्राप्ती कांबळे, यांचा सहभाग होता. काव्य स्पर्धेमध्ये देशभक्तीपर कवितांचे वाचन यात स्वरचित काव्य अथर्व क्षीरसागर, प्रणाली ताजने,साजिया शेख, यांनी सादर केले. नृत्य स्पर्धेत देशभक्तीपर गाण्यावर नृत्य कु दीपाली कोट्टी, साधना चव्हाण, आयशा पठाण,साजिया शेख, या मुलींनी नृत्य सादर केले. तसेच प्रजासत्ताक दिनी वर्ग 9 वि ची कु समीक्षा मेश्राम या विद्यार्थिनींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुखांनी केले यामध्ये सोनाली भोयर, सतीश घुले,रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार मधुकर घोडमारे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी स्वयंसेवक प्रवीण ढोंगे, वेदांत सुस्तरवार, साहिल केराम, मयूर खुटेमाटे, रोहन मडावी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता पसायदान या गीताने झाली.