गणेशपूर येथील चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ व ग्रामवाचनालय चे वतीने 76 वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा
.
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील गणेशपूर येथील चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशिय मंडळ व ग्रामवाचनालय गणेशपूर चे वतीने ज्येष्ठ नागरिक भवन गणेशपूर येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी थोरपुरुष यांच्या प्रतिमाचे पूजन व हारार्पण करून,ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजसलामी ,सामुहिक राष्ट्रगीत,ध्वजगीत व जयघोष करण्यात आला.श्री.वसंतराव उपरे , श्री.विलासराव राजुरकर व श्री.अशोकराव चौधरी यांनी मधुर स्वरात देशभक्तीपर गीत गायन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.उदयराव गोहोकार अध्यक्ष चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ व प्रमुख पाहुणे श्री.विलासराव राजुरकर,श्री.सुधाकर गारघाटे,डाॅ.किशोर व्यवहारे,डाॅ.अरूण एकरे व श्री.रामदास बोढे उपस्थित होते.याप्रसंगी सौ.निलीमाताई काळे यांचा वाढदिवस साजरा करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले.
ज्येष्ठांचा आहार व विहार कसा असावा ,जीवनशैली,वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे,योगा नियमितपणे करणे, गरजेनुसार औषधी वापर ई बाबतीत मार्गदर्शन करून जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नाची समर्पक उत्तरे दिली.श्री.विलासराव राजुरकर यांनी सुखी व आनंदी जीवनासाठी क्रुतज्ञताभाव , सकारात्मक विचार व जीवनशैली व ध्यान याबाबत मार्गदर्शन केले तर श्री.सुधाकर गारघाटे यांनी योग व उपवास पद्धती बाबतीत माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.उदयराव गोहोकार यांनी करून संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लक्ष्मण इद्दे उपाध्यक्ष यांनी केले तर आभार श्री.रामदास बोढे सचीव यांनी मानले .यावेळी सौ.ठक मॅडम यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांची रक्तदाब तपासणी करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.दिगंबरराव गोहोकार,श्री.गुलाबराव निते,श्री.महादेव खंगार,श्री.भास्कर खारकर,सौ.बोबडे ताई,सौ.छाया लिचोडे व वाचनालयातील विद्यार्थी यांनी सहकार्य केले.