वणीच्या शासकीय मैदानावर प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमात विवेकानंद विद्यालयाने पटकाविला पहिला क्रमांक
सुरेंद्र इखारे वणी : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित शासकीय मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमात विवेकानंद विद्यालयाच्या माध्यमिक गटाने “महाराष्ट्राची लोकधारा “या विषयावर आधारित महाराष्ट्र राज्यात आनंदाने साजरे केले जाणारे गुडीपाडवा पोळा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी इत्यादी सण नृत्याच्या माध्यमातून सादर केले. या सादरीकरणात विद्यालयाचे एकूण 125 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीला वाव देणाऱ्या ह्या सादरीकरणाला सर्व वणीकर प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. वणीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाच्या अध्यक्षा ताराबाई ठावरी उपाध्यक्ष प्रा. डॉ.शंकरराव व-हाटे सचिव अविनाशभाऊ ठावरी, मंडळाच्या संचालिका तथा विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वंदनाताई व-हाटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप आसकर,प्रभारी शिक्षक गंगाधर गेडाम, नवनाथ नगराळे यांनी नृत्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. विजयासाठी प्रभारी शिक्षक श्री सुनील बेसकर, आशिष मडावी, किशोर बोडे, संतोष म्हसे, हेमचंद्र तिखट तसेच विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.