Tuesday, May 20, 2025
Google search engine

शालेय वार्षिक परीक्षा 14 एप्रिल 2025 पुर्वी घेण्यात याव्यात.

शालेय वार्षिक परीक्षा 14 एप्रिल 2025 पुर्वी घेण्यात याव्यात.
नागपूर ( जयंत साठे ) वाढती उष्णता, महापुरुषांची जयंती,सण लक्षात घेता शालेय वार्षिक परीक्षा 14 एप्रिल 2025 पूर्वी घेण्याचे आदेश संबंधित शैक्षणिक संस्थांना निर्गमित करण्यात यावे. याबाबतचे निवेदन उपसंचालक, (शिक्षण) शिक्षणाधिकारी, माध्यमिक , प्राथमिक नागपूर यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आले.
जवळपास 95 टक्के शैक्षणिक संस्था 10 एप्रिल पर्यंत आपल्या वार्षिक परीक्षा आटोपतात.
परंतु काही शैक्षणिक संस्था जाणीवपूर्वक शेवटचे पेपर 15 आणि 16 एप्रिल ला ठेवून पालक विद्यार्थ्यांना वेठीस धरतात.
यात प्रामुख्याने उत्तर नागपूरातील काही नामवंत शैक्षणिक संस्था नाहक संताप आणण्याचा प्रयत्न करतात.
यामुळे नाहक त्रास विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागतो व सणात जयंती उत्सवात सहभागी होता येत नाही.
परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना शैक्षणिक संस्थांनी याची जाण ठेवावी.
अन्यथा अशा मुजोर संस्थेच्या विरोधात परीक्षा काळात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने व समविचारी संघटनेला सोबत घेऊन तीव्र निषेध करण्यात येईल.
असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) विदर्भ महासचिव बाळू घरडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular