वणीत झालेल्या तुफानी वादळ वाऱ्यात 50 टनाचे 55 टिनाचे वजनदार शेड 150 फूट उंचावरून हवेतून 700 मीटर अंतरावर कोसळले
या वादळ वाऱ्यात जीवित हानी
टळली
सुरेंद्र इखारे वणी येथे आज दिनांक 18 एप्रिल 2025 रोज शुक्रवारला सायंकाळी 5.30 ते 6 वाजताचे दरम्यान तुफान वादळी वाऱ्याचा पाऊस पडून वणी शहराच्या जुन्या वस्तीतील तलाव रोड येथील कस्तुरचंद जैन यांच्या घरावरील जवळपास 50 टनाचे 55 टिनपत्र्याचे शेड तुफान वादळी वाऱ्यात उडून 500 ते 700 मीटर अंतरावर उंच हवेतून शेड जामा मस्जिद मागील महादेव मंदिर गंडलीपुऱ्यातील इलेक्ट्रिक पोल उखडून तीन रोड च्या मध्यभागी पडल्याने जीवित हानी टळली असून मात्र बोण्डे च्या घराचे नुकसान झाले आहे.
त्यावेळी आकस्मिक झालेल्या वादळी वाऱ्याचा वेग काय असेल याची कल्पना करता येणार नाही एवढ्या तुफान वादळ वाऱ्याने 150 फूट हवेतून लोखंडी 55 टिनाचे शेड तलावरोड येथील कस्तुरचंद जैन यांच्या घरावरील शेड वादळी वाऱ्यात उडून जत्रा रोड येथील गांडलिपुर्यातील महादेव मंदिर येथे येऊन पडले याबाबतची माहिती स्वतः कस्तुरचंद जैन यांनी “wani 24 news ला दिली . उडालेले सेड घेण्याकरिता पिकअप वाहन आणून त्यांनी आपले शेड घेऊन गेले यामध्ये एम एस इ बी चा इलेक्ट्रिक पोल जमिनीतून उखडून तीन रोड च्या मध्यभागी पडले व यात बॉंडे यांचे घराचे नुकसान होऊन एम एस इ बी च्या सतर्कतेमुळे संपूर्ण वॉर्डाची लाईन बँद करण्यात आल्याने जीवित हानी झाली नाही अनर्थ टळला आज जवळपास 700 मीटर अंतरावरून 150 फूट उंच अशा वादळ वाऱ्यातुन वर्दळीच्या रस्त्यावर त्यावेळी कोणीही नसल्याने जीवित हानी टळली.बघ्यांची एकच गर्दि उडाली व वजनदार शेड पाहता अचंबित झाले.