Tuesday, May 13, 2025
Google search engine

वणी प्रक्षेत्र चे 161 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

वणी प्रक्षेत्र चे 161 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या वणी र नंबर 1152 च्या संचालकांची निवडणूक

सुरेन्द्र इखारे वणी :-    होऊ घातलेल्या वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या वणी च्या 161 सदस्य मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2014 च्या नियम 19 प्रमाणे वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी पतसंस्थेच्या समितीच्या सदस्यांची निवड करण्याच्या दृष्टीने निवडणूक होऊ घातली आहे यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल 2 ते 8 मे दुपारी 3 वाजेपर्यंत, छाननी 9 मे ,नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिध्द 13 मे 11वाजता, नामनिर्देशन मागे घेणे 13 ते 27मे दुपारी3 वाजेपर्यंत, निशाणी 28 मे सकाळी11वाजता,मतदान 7 जून सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. निवडणूक कार्यक्रम विचारात घेऊन 161 सदस्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजवायचा आहे.

पतसंस्था उदयास आल्यापासून म्हणजेच  1995 पासून अविरोध होणाऱ्या पतसंस्थेची आता निवडणूक होऊ घातली आहे. मागील काळात पतसंस्थेमध्ये अनेक गोष्टी चव्हाट्यावर आल्याने सदस्यांमध्ये नाराजीचा सूर येऊ लागल्याने आता निवडणूक झाली पाहिजे या उद्देशाने पतसंस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या निवडणुकीत अध्यक्ष ,सचिव होण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधले आहे. तेव्हा वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे 161 सदस्य मतदार कोणाला स्वीकारेल हे येणारा काळच ठरविणार आहे. वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी एस डी मडावी, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नानासाहेब चव्हाण, राज्य सहकारी निवडणूक अधिकारी अशोक गाडे हे पाहणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular