Sunday, August 16, 2026
Google search engine

वणी तालुका कृषी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

वणी तालुका कृषी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

राज्यव्यापी आंदोलनांतर्गत वणी तालुक्यातील कृषी सहाय्यकांचा समावेश ; प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात

महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना तालुका शाखेच्या  वतीने तालुका कृषी अधिकाऱ्याला दिले निवेदन

सुरेन्द्र इखारे वणी :  –   महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने कृषी सहाय्यकाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज दिनांक 7 मे 2025 रोजी वणी तालुका कृषी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी वणी तालुका कृषी अधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले.

मा ना माणिकरवजी कोकाटे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने कृषी सहाय्यकाच्या मागण्यांचे निवेदन दिले होते परंतु आजपर्यंत कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. अन्यथा मागण्यांची सोडवणूक न झाल्यास सर्व योजनेच्या कामकाजावर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कृषी सहाय्यकाच्या खालील मागण्या कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, कृषी विभाग डिजिटल असताना सुद्धा कृषी सहाय्यकाना लॅपटॉप द्यावा, कृषी सहाय्यकाना ग्रामस्तरावर मदतनीस द्यावा, कृषी सहाय्यकाना वाहतूक भाड्याची तरतूद करावी, कृषी सहाय्यक – कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण 4:1 करावे, अशा विविध प्रलंबित मागण्यांची महोदयांनी जातीने लक्ष घालून सोडवणूक करावी .संबधीत निवेदनाच्या प्रति मा ना आशिष जैस्वाल कृषी राज्यमंत्री, प्रधान सचिव कृषी मंत्रालय मुंबई,मा आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे याना पाठविण्यात आल्या यावेळी     महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना तालुका शाखा वणी च्या वतीने  कृषि सहाय्यक  डी. बी. पाचभाई अध्यक्ष, डी. आर. बरडे सचिव, एस. टी. महाजन, जिल्हा सचिव. बी. व्ही. वनकर कोषाध्यक्ष, पी. बी. कोठारे , एस. एन. शेंडे , एल. आर. कायंदे ,  पी. टी. खोब्रागडे ,  आर. जे. मेश्राम ,  यु. एम. वाघमारे , आर. ई. वडे . आर. एस.भगत , कु. के.एन. विधाते ,. कु. एस. एच. टोंगे ,  कु. पी. डब्लू. राव ,  कु. ए. व्ही. चतुर  कु. डी. एन. बंडगर उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular