Wednesday, July 1, 2026
Google search engine

बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत महाकाली झोपडपट्टीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत महाकाली झोपडपट्टीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या विविध उपक्रमातून विद्यार्थी व पालकात आत्मसन्मानाची भावना निर्माण होऊन; गुन्हेगारी शून्यावर

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांचे कौतुक

सुरेंद्र इखारे वणी :- नागपूर शहर अंतर्गत बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाकाली नगर झोपडपट्टीतील गरीब परिस्थितीशी झुंज देणाऱ्या व हातावर आणून पानावर खाणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी   वर्ग 10 वि व 12 वि मध्ये यश संपादन केल्याने अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पोलीस उपआयुक्त रश्मीता राव एन यांचे हस्ते करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस उपआयुक्त रश्मीता राव एन म्हणाल्या गरीब परिस्थितीतही अभ्यासाची जिद्द,चिकाटी असेल तर आत्मविश्वासाने यश खेचून आणता येते असे प्रतिपादन  केले.

यावेळी एसीपी नरेंद्र हिवरे, बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे उपस्थित होते. महाकाली झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी गुन्हेगारी परिसरात वेळोवेळी बैठका घेऊन,तसेच पोलीस दादा सारखे उपक्रम राबवून जनजागृती करून या परिसरातील गुन्हेगारी शून्यावर आली  याकडे लक्ष वेधण्यात आले. पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्रमांक 4 नागपूर शहर  बेलतरोडी ठाण्या अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस निरीक्षक रुपाली बावनकर, सपोनि पंकज काकडे, स्पोउपनी अच्युत रिढे, स्नेहलता जायभाये, प्रशांत ठवकर, अजय नेवारे, रवी आकरे यांनी परिश्रम घेतले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular