विवेकानंद विद्यालयात उपमुख्याध्यापिका सौ वंदना वऱ्हाटे व शिक्षक नवनाथ नगराळे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- विवेकानंद विद्यालयाचे जेष्ठ गणित शिक्षक नवनाथ मनोहर नगराळे तसेच विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका वंदना शंकरराव व-हाटे ह्या नियत वयोमानानुसार विद्यालयातून प्रदिर्घ सेवा देवून सेवानिवृत्त होत असतांना त्यांचा भावपूर्ण सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाचे सचिव अविनाश ठावरी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमूख अतिथी म्हणून श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाच्या अध्यक्षा मातोश्री ताराबाई ठावरी उपाध्यक्ष प्रा.डॉ शंकरराव व-हाटे, संचालक श्रीराम कोंगरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप आसकर , कु. विजया देवाळकर, माजी मुख्याध्यापक भास्कर काळे,गंगाधर गेडाम, सुनिल बेसकर, सौ. कोंगरे काकु सत्कारमूर्ती नवनाथ नगराळे, सुषमा नगराळे त्यांचा मुलगा निसर्ग नगराळे, अपेक्षा नगराळे, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका वंदना व-हाटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देवून सत्कारमूर्तींचा विवेकानंद प्राथमिक, माध्यमिक व पतसंस्थेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.मंचावार उपस्थित मान्यवरांनी व विद्यालयाचे शिक्षक पुरुषोत्तम पिटलावार, आरती ठावरी, सुनिल बेसकर, जयंत मेश्राम, निसर्ग नगराळे यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्तींच्या जीवन कार्यावर यथोचित प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर गेडाम यांनी केले तर कार्यक्रमाचे सदाबहार सुत्रसंचालन किशोर बोढे यांनी केले. तर आभार सचिन दुमणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या प्राथमिक, माध्यमिक, तांत्रिक, व वाचनालयाच्या समस्त कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.