वणी तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनी मध्ये विवेकानंद विद्यालयाचे सुयश
वणी तालुक्यात विद्यार्थ्यांचे कौतुक
सुरेंद्र इखारे वणी :- शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कूल,वणी येथे तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन गट संसाधन केंद्र वणीच्या माध्यमातून करण्यात आले .
यात वणीच्या विवेकानंद विद्यालयाने “शेत जमिनीला सिंचनाद्वारे मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित प्रणालीच्या माध्यमातून मातीमधील ओलाव्याचे प्रमाण ओळखून योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करता येतो”या विषयावर आधारित मॉडेल तयार करून माध्यमिक गटात दुसरा क्रमांक पटकाविला. या नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पाने भविष्यात भारतीय शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये योग्य प्रमाणात जलसिंचन करण्यास व उपलब्ध जलसाठ्याचा योग्य प्रमाणात वापर करण्यास निश्चितच मदत होणार आहे. असे कु तमन्ना बहादे, सृष्टी लखमापूरे या सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले या विद्यार्थिनींची मार्गदर्शक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक आशिष मडावी यांनी विशेष मार्गदर्शन केले.यावेळी वणी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, प्रा. अभिजीत अणे, विक्की मोहनानी, विस्ताराधिकारी निलेश हेडाऊ सर या मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सहभागी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती, ताराबाई ठावरी, संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य शंकरराव व-हाटे, संस्थेचे सचिव अविनाश ठावरी तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप आस्कर, उपमुख्याध्यापक सुनील बेसकर, पर्यवेक्षक प्रेमदास राठोड, तथा विद्यालयाच्या समस्त शिक्षकांनी अभिनंदन व कौतुक केले.




