Friday, June 12, 2026
Google search engine

महसूल भवन येथे जनगणना 2027 घरयादी गटाचे अंतिम नकाशे सादर

महसूल भवन येथे जनगणना 2027 घरयादी गटाचे अंतिम नकाशे सादर

सुरेंद्र इखारे वणी :-   येथील महसूल भवन येथे आज दिनांक 12 जून 2026 रोज शुक्रवारला सकाळी 11.00 वाजता  जनगणना 2027 संदर्भातील प्रगणक यांनी घरयादी गटाचे तयार केलेले अंतिम मांडणीदर्शक नकाशा पर्यवेक्षकांचे माध्यमातून सादर करणेबाबत सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जनगणना 2027 संदर्भातील घरयादी गटाचे मांडणी दर्शक अंतिम नकाशे सादर करताना उपस्थित सर्व पर्यवेक्षकांना माननीय तज्ञ मार्गदर्शक देवेंद्रजी बच्चेवार सर यांनी मंडणीदर्शक नकाशा संदर्भात पूर्व सूचना देऊन त्यामध्ये असणाऱ्या बाबींची माहिती देण्यात आली त्यानंतर नकाशाची तपासणी करून व त्यामध्ये असणाऱ्या त्रुटींची पूर्तता करण्यास सांगितले . तसेच  महसूल सहायक अधिकारी योगेश कोणापुरे  यांनी या सभेत घरयादी गटाचे काम करणाऱ्या प्रगणकानी घरयादी गटाच्या पत्रकाचा उपयोग केला असेल तर प्रगणकानी सदर पत्रके महसूल कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या. त्यानंतर उपस्थित सर्व पर्यवेक्षकांकडून प्रगणकानी तयार केलेले अंतिम नकाशे घेत असताना त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी संदर्भातील म्हणणे  प्रगणकांकडून  लेखी स्वरूपात घेऊन  तसेच प्रगणकानी  घरयादी व घरगनना गटाचे पूर्ण केलेल्या कामचे पर्यवेक्षकांनी प्रमाणपत्र / घोषणपत्र तसेच मंडणीदर्शक नकाशे  महसूल सहाय्यक अधिकारी योगेश कोणापुरे, तज्ञमार्गदर्शक प्रवीण वैद्य, तंत्रस्नेही ऋषी सुरपाम यांचेकडे सादर करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular