Sunday, August 16, 2026
Google search engine

कु सानिया मनोहर चांदसूर्य हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला 

कु सानिया मनोहर चांदसूर्य हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

कु चंचल मनोज झोडे हिने प्रोत्साहनपर क्रमांक पटकावला

विद्यालयाचे वतीने सर्व सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन

सुरेंद्र इखारे वणी :- वणी येथे स्वतंत्र्य दिनाचे पर्वावर क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्ताने आणि ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 16 ऑगस्ट2026 रोजी दुपारी 11 .00 वाजता वाघोबा -खंडोबा देवस्थान येथे तिन्ही तालुक्याच्यावतीने दोन गटात वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने शालेय गटातून विवेकानंद विद्यालय कायर येथील वर्ग 10 वी ची विद्यार्थिनी कु सानिया मनोहर चांदसूर्य हिने वृक्षसंवर्धन ही काळाची गरज या विषयावर विचार व्यक्त करून वत्कृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार, मार्गदर्शक प्रा बाळासाहेब राजूरकर, प्रा पुरुषोत्तम पाटील, पांडुरंग पंडिले, प्रा नितीन मोहितकर, धनंजय उरकुडे , नारायणराव मांडवकर, लक्ष्मण इद्दे सर, विजय गंधेवार, या मान्यवरांचे हस्ते कु सानिया मनोहर चांदसूर्य हिला प्रथम पारितोषिक , मोमेंटो, व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच विद्यालयाची विद्यार्थिनी कु चंचल मनोज झोडे हिला प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिला सुद्धा मान्यवरांचे हस्ते मोमेंटो, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच विद्यालयातील आठ विद्यार्थिनीं  कु तन्वी चंदावार, शारदा चव्हाण, स्नेहा तुंमावार, पल्लवी चिकराम सेजल पारखी, वैष्णवी निमसतकार,चैताली ठमके  , श्रीस्ता गुरनुले यांनी सहभाग नोंदवून त्यांना सुद्धा गौरविण्यात आले
त्यांच्या या यशाबद्दल व उत्कृष्ट कामगिरी बद्दल श्रीरामकृष्ण शिक्षण संस्थाचे अध्यक्ष जयंत चौहान,सचिव सतीश घुले व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे, सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, सोनाली ठाकूर, सचिन टोंगे ,मधुकर कोडापे, आकाश बोरूले तसेच पालकांनी व ग्रामवासीयांनी कौतुक व अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular