Wednesday, April 22, 2026
Google search engine

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वणी कार्यालयाचे केले मनःपूर्वक अभिनंदन

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वणी कार्यालयाचे केले मनःपूर्वक अभिनंदन

महाराष्ट्र राज्याच्या 100 दिवसाच्या शासकीय कार्यालयीन कार्यक्रमात अमरावती विभागात वणी कार्यालयाचा प्रथम क्रमांक

तहसीलदार कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला

सुरेंद्र इखारे वणी :-   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील 358 तालुक्यातील 10000 शासकीय कार्यालयाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने अमरावती विभागातून वणी महसूल कार्यालयाचे तहसीलदार निखिल धुळधर व उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे यांचे  कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय विभागाच्या प्रत्येकी महसुली विभागातील उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयाची निवड केली आहे. यामध्ये वणी महसूल तहसीलदार कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या दोन कार्यालयाने अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यालयाने शासनाच्या 10 मुद्यांवर कार्यालयीन कामकाज केले यामध्ये जसे वेबसाईटवर सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञान अशा विविध मुद्यांवर महाराष्ट्र राज्याच्या 358 तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी केली यामध्ये प्रामुख्याने वणी तहसीलदार कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या शासकीय उपक्रमात वणी विभागातील विविध शासकीय कार्यालयाने सहभाग नोंदविला होता यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार निखिल धूळधर व उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे साहेबांच्या कार्यालयाने प्रथम क्रमांक अमरावती विभागातून पटकावला त्यांच्या शासकीय कामगिरी बद्दल वणी विभागात कौतुक व अभिनंदन केले जात आहे.  या कार्यालयाचे यशस्वीतेसाठी तहसीलदार निखिल धुळधर, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोली, नायब तहसिलदार विवेक पांडे, नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, नायब तहसिलदार खिरेकर, व अन्य तहसीलचे कर्मचारी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे साहेब, ठाणेदार उंबरकर साहेब व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular