शाळा क्रमांक आठ येथे महापरिनिर्वाण दिनी ” सेल्फी विथ माय फॅमिली” या उपक्रमाचा बक्षीस सोहळा
सुरेंद्र इखारे वणी :- येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक आठ येथे आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी विश्वरत्न, बोधिसत्व , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे टक्केवारी वाढण्याचे दृष्टीने “सेल्फी विथ माय फॅमिली” या उपक्रमाचा बक्षीस सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार खिरेकर साहेब हे होते तर बक्षीस वितरक म्हणून वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे साहेब , प्रमुख अतिथी प्रशासन अधिकारी नितेश राठोड, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मनीषाताई शिवरकर व शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत भाग घेतलेल्या सर्व पालकांना या कार्यक्रमानिमित्त लकी ड्रॉ काढून बक्षीस देण्यात आले .
विशेष म्हणजे विद्यार्थ्याद्वारा राबविलेल्या उपक्रमामुळे वणी शहरातील मतदान केंद्र क्र.143 बुथवर मोठ्या प्रमाणात 80.79% मतदान झाले.त्यामुळे वणी शहरातून सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे मतदान केंद्र ठरले आहे. महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शाळेतर्फे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पालकांनी शंभर टक्के मतदान केले व शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांकडून “सेल्फी विथ माय फॅमिली” या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाची सुरुवात गजराज परोथी ,स्वरा गुरूनुले व डिंपल गुरनुले या विद्यार्थिनीच्या स्वागत गीताने झाली. यावेळी ईशा मानकर ,कु चतुरी डांगे व कु.आरोशी पुरी या विद्यार्थिनींनी विचार व्यक्त केले. तसेच लकी ड्रॉ काढून यामध्ये सतीश गुरनुले यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर लक्ष्मण डांगे यांना द्वितीय व विनोद कळस्कर यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस उपस्थित मान्यवरांचे हस्ते देण्यात आले . याप्रसंगी गिरीधरजी चवरे साहेब , सचिन जी गाडे साहेब यांनी शाळेने राबविलेल्या उपक्रमाबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष खिरेकर साहेब यांनी मतदानासाठी राबविलेल्या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार व विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र खरवडे यांनी केले तर आभार अविनाश तुंबडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका सुनिता जकाते ,किरण जगताप, निलिमा राऊत, छाया मांढरे मदतनीस निशाताई कावडे यांनी मोलाचे सहकार्य केले.व कार्यक्रमाला बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता.