ब्ल्यू क्लब तर्फे बाबासाहेबांना आदरांजली
नागपूर ( जयंत साठे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महपरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ” ब्ल्यू क्लब “या सामाजिक मंडळाद्वारे आदरांजली देण्यात आली. दीप प्रज्वलन करून बुद्ध वंदना घेतल्यावर बाबासाहेबांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व मूक आदरांजली देण्यात आली.
या प्रसंगी आकाशवाणीचे सेवानिवृत्त उच्च अधिकारी,जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते, दलित पॅन्थर चे माजी लढवय्ये व राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त कवी आयु. बबनदादा चहांदे यांनी प्रबोधन करतांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आंबेडकरी जनतेच्या उदासीनतेवर व आपल्या पुढाऱ्यां प्रति चिंता व्यक्त केली.आंबेडकरी चळवळीत युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. शेवटी सर्वांनी आवाजी गर्जनाने भीम संकल्प घेतला.या प्रसंगी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रामुख्याने अध्यक्ष विनायक हाडके, सचिव सुधाकर लोखंडे, प्रमुख संयोजक अविनाश कठाणे, कोष्याध्यक्ष पुरुषोत्तम निमसरकार तसेच नेमराव कांबळे, राजेश हाडके,हिरामण वाघमारे, एस. टि. चौहान, डॉ. सिद्धार्थ वासनिक, आनंद वासनिक, गौतम मोडक,प्रकाश मेश्राम, किशोर नगराळे,दिलीप मेश्राम,सुनील आवळे, माधव चिंचखेडे, महेंद्र जिभे, ताराचंद मून, धनराज पाटील, बी. एल. मेश्राम, प्रदीप मोहिले,विद्याधर सोनटक्के, विद्यासागर गवळी, चंद्रशेखर शेंडे, धनराज टेम्भरे, केशव उके, सुनील वाकोडे, आनंद मानकर,यशवंत वासनिक, गोपीचंद रामटेके, डॉ. ताराचंद मेश्राम, रंजन मेंढे,प्रकाश पाटील, सुनील रंगारी, काही महिला व इतर हे सर्व आवर्जून उपस्थित होते.