Tuesday, January 13, 2026
Google search engine

आसक्ती रहित कर्मयोग हीच गीतेची शिकवण – कीर्ती कोंडावार

आसक्ती रहित कर्मयोग हीच गीतेची शिकवण – कीर्ती कोंडावार

गीताचे महात्मे स्पष्ट करून त्यातील आलेल्या अध्ययनातील अनुभव व्यक्त केला

सुरेंद्र इखारे वणी    :- “जगातील सर्वच महापुरुषांना आदर्श वाटणारी श्रीमद् भगवद्गीता आपल्याला निष्काम कर्मयोग आणि समत्व योग सांगते. विषादा नंतर धर्मसंमूढ झालेल्या अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी संपूर्ण जगाला दाखविलेला हा आत्म उन्नतीचा मार्ग आहे.” असे प्रतिपादन गीताव्रती कीर्ती किशोर कोंडावार यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, संस्कृत भारती आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या माझं गाव माझा वक्ता या व्याख्यान शृंखलेत गीता जयंतीच्या निमित्ताने “माझा गीता अध्ययनाचा अनुभव ” या विषयावर त्या व्यक्त होत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणीचे अध्यक्ष डॉ दिलीप अलोणे, कार्यकारी अध्यक्ष माधव सरपटवार, संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकारी सदस्या प्रणिता भाकरे तथा विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ अभिजित अणे उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये माधव सरपटवार यांनी आबाजी देशपांडे यांच्या काळात वणीत रुजलेल्या आणि विस्तार पावलेल्या गीता अध्ययनाचा इतिहास उलगडून दाखवत भविष्यामध्ये भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम सादर व्हावा अशी मनीषा जाहीर केली.
गीता गुंजन, गीता जिज्ञासु , गीता पथिक आणि गीताव्रती अशी चार स्तर अत्यंत यशस्वी रीतीने पूर्ण केल्यानंतर शृंगेरीपीठाधीश्वर परमपूज्य शंकराचार्य श्री विधुशंकर भारती महाराजांच्या द्वारे कीर्ती कोंडावार यांना आशीर्वाद प्राप्त झाल्याबद्दल विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दिलीप अलोणे, संस्कृत भारतीच्या वतीने प्रणिता भाकरे आणि वनिता समाजाच्या वतीने भारती सरपटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आरंभी गीतेचे महात्म्य स्पष्ट करून पुढे कीर्ती कोंडावार यांनी आपली संपूर्ण अध्ययन यात्रा आणि त्यात आलेले वेगवेगळे अनुभव सादर केले.
श्रीक्षेत्र शृंगेरी येथे झालेल्या सत्काराचे रोमांचकारी वर्णन श्रोत्यांना देखील प्रभावित करून गेले.
संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकारीणी सदस्या प्रणिता भाकरे यांनी आपल्या मनोगतात जीवनातील ग्लानी आणि शैथिल्य नष्ट करणार्‍या गीतेच्या अभ्यासासाठी विविध उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ दिलीप अलोणे यांनी संस्कृत भारतीच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक करीत हे अनुभव ऐकल्यावर माझ्या मनात देखील गीता अध्यायाची अंत:प्रेरणा जागृत झाल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ वणीचे सचिव डॉ .अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृत भारतीचे उपाध्यक्ष प्रशांत भाकरे तथा प्रमोद लोणारे, राम मेंगावार आणि देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular