Saturday, October 3, 2026
Google search engine

वणीच्या लायन्स स्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती व ” सेवा संकल्प अभियानांतर्गत”  विकसित भारताच्या संकल्पनेला बळ

वणीच्या लायन्स स्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती व ” सेवा संकल्प अभियानांतर्गत”  विकसित भारताच्या संकल्पनेला बळ

चिमुकल्यांच्या  भजनाचे सूर, भाषणांचा जोश अन् नाटिकेतून स्वच्छता व शासकीय योजनांतून विकास 

सुरेंद्र इखारे वणी :

देशमुखवाडी येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सत्य, अहिंसा, साधेपणा, देशसेवा आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा जागर विद्यार्थ्यांना करून देत दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे होते. यावेळी प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे तसेच पर्यवेक्षिका सौ. सुनीता खुसपुरे मंचावर उपस्थित होत्या. प्रारंभी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे यांनी केले. त्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीसाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले.

शिक्षिका भारती वानखेडे व मनिषा बडनेरकर यांनी गीत तसेच ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले.

विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून दोन्ही महापुरुषांचे देशासाठीचे योगदान, त्यांचे विचार, आदर्श आणि राष्ट्रनिर्मितीतील भूमिका प्रभावीपणे मांडली.

सौ मनिषा ठाकरे व सीमा पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष आकर्षण ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या नाटिकेतून स्वच्छता व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. या नाटिकेतून शासकीय योजनांचा नागरिकांना होणारा लाभ, योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल तसेच देशाच्या विकासाला मिळणारी चालना याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ घेतल्यामुळे नागरिकांचे जीवनमान कशा प्रकारे सुधारू शकते आणि त्यातून विकसित भारताच्या संकल्पनेला कशा प्रकारे बळ मिळते, हे विद्यार्थ्यांनी नाट्यरूपातून मांडले.

यानंतर अकॅडेमिक डायरेक्टर तथा प्राचार्य प्रशांत गोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या विचारांसोबतच लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि देशनिष्ठेच्या कार्याचा उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पर्यवेक्षिका सौ. सुनीता खुसपुरे यांनी विद्यार्थ्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. महापुरुषांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुरेख संचालन रूणाली नगराळे व मयुरी नन्ने यांनी तर ज्योती ठावरी यांनी आभार मानले. या प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular