अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा दिवस – सोनाली भोयर
कायर येथे आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन साजरा
सुरेंद्र इखारे वणी :–भारतीय राज्यघटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले पाहिजे मग ती कोणतीही जात, धर्म, भाषा, किंवा समुदाय असो देशाच्या संविधानात अल्पसंख्याकाच्या संरक्षणाची तरतूद केली आहे. अल्पसंख्याक लोकांना पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो असे सोनाली भोयर यांनी प्रतिपादित केले.
वणी तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयात आज दिनांक 18 डिसेंबर 2024 रोज बुधवारला दुपारी 1.00 वाजता विद्यालयाचे सभागृहात “ आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन” साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे, गणित अध्यापिका सोनाली भोयर उपस्थित होत्या.
परमपूज्य स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे यांनी या दिनी अल्पसंख्याकाचे हक्क व अधिकार याविषयी माहिती दिली. तसेच अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी अल्पसंख्याक हक्क दिवसाचे महत्व प्रतिपादित करताना अल्पसंख्याक हक्काची संकल्पना,नागरी हक्क , व अल्पसंख्याक लोकांचे हक्क कसे कायद्याने संरक्षित केले याबाबत सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली भोयर यांनी केले तर आभार कु प्रणाली ताजने हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर कोडापे, आकाश बोरूले, रोहन मडावी, मयूर खुटेमाटे, आयशा पठाण, साजिया शेख, प्राप्ती कांबळे ,इशांत पिदूरकर यांनी सहकार्य केले.