थोरपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून विवाह सोहळा संपन्न
चौधरी व झाडे परिवाराच्या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे कौतुक
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील पळसोनी येथील सुरज सुनंदाताई ज्ञानेश्वर शामराव चौधरी आणि हर्षदा उषाताई राजेश नत्थुजी झाडे यांचा विवाह दिनांक १२ मे २०२६ रोजी वसंत जिनिंग लॉन येथे पारंपरिक व आधुनिक पद्धतीच्या संगमाने संपन्न झाला.
हा पारंपरिक व आधुनिक सोहळा अतिशय नयनरम्य आणि भव्य शिवविवाह अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारिवारिक वातावरणात पार पडला.या सोहळ्यात विशेषतः थोरपुरुषांची प्रतिमा राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून साकारलेला सोहळा उपस्थित लोकांना शिवकालीन संस्कृतीचा अनुभव होत होता.
या शिवविवाहाचा प्रारंभ राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सामुहिक जिजाऊ वंदनेने प्रारंभ झाला. या लग्न सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा, वारकरी संप्रदाय मंडळींचा हरिपाठाचा गजर आदींच्या भक्तीमय वातावरणात वधुवराचे आगमन विवाह मंचावर झाले.सुगम संगीताच्या माध्यमातून संतांची अभंगवाणी, शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील गीते ही काही ठळक वैशिष्ट्ये या सोहळ्यात रंग भरणारी होती.तसेच आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.या शिवविवाह सोहळ्याचे सोपस्कार प्रशांत गोखरे, संजय गोडे, दत्ता डोहे यांनी पुर्ण केले.
या सोहळ्याला विशेष करून सन्माननीय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, आमदार संजयभाऊ देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, किरणताई देरकर, ऍड.मुलचंदजी जैन, काँग्रेसचे संजय खाडे, प्रा.टीकाराम कोंगरे,फारुकभाई चिनी, किशोर ढूमने,डॉ अंकुश बलकी व समस्त व्हाऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. असा हा आगळावेगळा दिमाखदार व शिस्तबद्ध पद्धतीने लग्न सोहळा पार पडला . अशा या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याचे कौतुक समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे.




