Sunday, January 26, 2025
Google search engine

वणीत महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त सत्कार व प्रबोधन मेळावा

वणीत महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त सत्कार व प्रबोधन मेळावा

सुरेंद्र इखारे वणी :-     येथील खंडोबा- वाघोबा देवस्थान सभागृहात वणी मारेगाव व झरी तालुक्याच्यावतीने “महाराज छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या 248व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन 5 जानेवारी 2025 रोज रविवारला दुपारी 12.00 वाजता आयोजित केला आहे.

या सत्कार व प्रबोधन मेळाव्यात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर व वणी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजयभाऊ देरकर यांचा धनगर समाजच्यावतीने सत्कार आयोजित केला आहे तेव्हा सर्व समाज बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार प्रतिभाताई धानोरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधनमंचाचे अध्यक्ष राजेंद्र कोरडे,विशेष अतिथी नवनिर्वाचित आमदार संजयभाऊ देरकर, प्रमुख मार्गदर्शक मा डॉ तुषार मरलावार, प्रमुख अतिथी पांडुरंग पंडिले, प्रा संजय लव्हाळे, मुख्याध्यापक शंकर केमेकर, सौ प्रतिभा लोंढे उपस्थित राहणार आहे.

या प्रबोधन सोहळ्यात ब्रिटिश महासत्तेच्या विरोधातील लढाईत अग्रणी महाराज छत्रपती यशवंतराव होळकर यांचे जीवन चरित्रावर विभागीय अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती विदर्भ विभागाचे मा डॉ तुषार मरलावार हे मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या समाजप्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेंद्र कोरडे, डॉ मधुकर आसकर, राम झिले, धनंजय उरकुडे, राजेश निरे, पांडुरंग पंडिले, संजय लव्हाळे, भाऊराव मत्ते, विकास चिडे, रघुनाथ कांडळकर, सुरेंद्र इखारे, संतोष सांबरे, काशिनाथ पचकटे, सूर्यभान चिडे, वसंता गोरे, करावीं वैद्य, प्रतिभा लोंढे, विद्या येवले, आशा आसकर, आशिष सांबरे, राजीव बोबडे, संजय काळे, मंगेश चामाटे, महादेव मत्ते, भारत उरकुडे यांनी केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular