चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी नवनिर्वाचित आमदार संजयभाऊ देरकर यांची निवड
सुरेंद्र इखारे वणी :- नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या वणी विधानसभा क्षेत्राच्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना(उबाठा) पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संजयभाऊ देरकर यांची नुकतीच विधिमंडळ अधिवेशना नंतर लगेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी निवड केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) या पक्षाला उमेदवारी मिळाली त्यामुळे शिवसेना (उबाठा) या पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले . उच्चविद्याविभूषित व संयमी व्यक्तिमत्त्व असलेले संजयभाऊ देरकर यांच्या रुपात शिवसेना (उबाठा)पक्षाची उमेदवारी मिळाल्याने या चुरशीच्या निवडणुकीत वणी विधानसभा क्षेत्राच्या संपूर्ण मतदारांचा विजय आहे . त्यामुळे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्र हा भागवामय झाला आहे.तसेच विधिमंडळात वणी विधानसभा क्षेत्राच्या समस्या मांडून लोकप्रतिनिधींची चुणूक दाखविल्याने मतदारसंघातील आता मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत . तसेच नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन पार पडताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी नवनिर्वाचित आमदार संजयभाऊ देरकर यांच्यावर सोपविल्याने शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठी जबाबदारी आली आहे.